लक्ष्मी पूजन

Started by Atul Kaviraje, November 01, 2024, 09:55:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

लक्ष्मी पूजन-

दिवे पेटले, उजळली सारी रात्र
लक्ष्मी माताआली करुनी सोळा शृंगार
सजवलेल्या रांगोळीत, आनंदाचा वास,
संपूर्ण घरभर झाला, प्रेमाचा प्रकाश.

फुलांनी सजलेलेतबक, नैवेद्य पानात वाढले
लक्ष्मी पूजनाच्या या दिवशी, सर्वांनी हात जोडले
धन, समृद्धी, ज्ञान दे, मातेस साकडं घातले,
तुझ्या आशीर्वादाने होऊ दे जीवन सुंदर, गाऱ्हाणे घातले.

दीपांच्या उजेडात, सुखाची प्रार्थना
संपूर्ण कुटुंबासोबत, करूया एकत्र पूजा
रंग, प्रकाश, आणि गोड गाणं,
लक्ष्मी मातेच्या चरणी, आम्ही अर्पितो श्रद्धेनं.

या सणाच्या निमित्ताने, एकत्र येऊ
संपूर्ण जगात प्रेम आणि शांती पसरवू 
लक्ष्मी पूजनाचा आजचा खास दिवस,
सर्वांच्या जीवनात येवो, आनंद उदयास.

--अतुल परब
--दिनांक-01.11.2024-शुक्रवार.
===========================================