तिच्या नावाचं सुखं तेवढं मागू दे..

Started by Shrikant R. Deshmane, November 02, 2024, 07:29:41 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

जिथून सुरवात केली होती,
आज त्याच मंदिरात तिच्यासोबत आलो,
तिला मनापासून हात जोडलेले पाहून,
मी ही मग थोडा भक्तीत तल्लीन झालो..

निरागस रूप तिचं देवीच, तिला खूप भावलं,
नवरी समजून तिला, पुजाऱ्याने ही बोलावलं,
खुश होऊन तिने, दर्शनाची रांग सोडली,
परडी मधे ओटी, सोबत चाफा अन् अपट्याची ही पाने तोडली..

अंतर्मनातील देवीला नमस्कार करून,
स्वतःला माझ्या नावाने वरली,
हळद - कुंकू लावून कपाळी तिने,
खन्या - नारळानं देवीची ओटी भरली..

काय मागितलं असेल देवाकडे,
मला खरंच नव्हतं ठाऊक,
तिच्या निरागस डोळ्यांतील भाव पाहून,
मीही थोडा झालो भाऊक..

तिचं दर्शन होताच,
मी देवी पुढं उभा ठाकलो,
दर्शन घ्यायला मीही मग,
नम्रतेने वाकलो..

देवीला पाहून मग,
मी ही थोडा भानावर आलो
तिच्या सर्व ईच्छा तू पूर्ण कर अशी,
त्याच देवी ला मागणं मागून आलो..

झालेल्या सर्व चुका माफ करून,
नव्याने जगण्याची सुरवात होऊ दे,
तिच्या वरचं सर्व दुःख सुध्दा देवी ने मग,
माझ्या नावे पदरात टाकू दे..

तीच व्हावी देवी माझी,
संसारात माझाही हातभार लागू दे,
माझ्यासाठी काही नाही दिलंस तरी चालेल देवी,
पण तिच्या नावाचं सुख तेवढं मागू दे..
बस् तिच्या नावाचं सुख तेवढं मागू दे..


श्रीकांत रा. देशमाने
दि: १३/१०/२०२४
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]