नव वर्षा तुझे स्वागत

Started by बाळासाहेब तानवडे, December 30, 2010, 07:17:53 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

नव वर्षा तुझे स्वागत

धरेची पुन्हा एक सूर्य परिक्रमा पूर्ण झाली.
आता तुझ्या आगमनाची तिथी ती आली.
जुने साल चालले परतीचा सलाम मागत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

नव वर्ष सर्वास लाभो सुखाचे,
मौज मजा अन हर्ष मुखाचे.
तुझ्या आगमना प्रती जागेल जगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

तरुणाईचा जोशीला जल्लोष फुलेल.
अबालवृद्धात उत्साह तो भरून उरेल.
तुझ्या स्वागता नसेल आनंदा अंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

झाले गेले सारे विसरून जाऊ.
नवी आशेची सुख स्वप्ने ती पाहू.
जीवनात येऊ दे अजुन खास रंगत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

या वर्षात सारे शुभ शुभ घडावे.
ऐतिहासीक नोंदीत तुझे महत्व वाढावे.
तुझ्या नावाची राहो किर्ती दिगंत.
नव वर्षा करू तुझे आनंदे स्वागत.

© बाळासाहेब तानवडे – ३०/१२/२०१०
http://marathikavitablt.blogspot.com/
http://hindikavitablt.blogspot.com/
प्रतिसादाची प्रतीक्षा