ये ग दिवाळी, तुझं पणतीने मी स्वागत करते

Started by Atul Kaviraje, November 05, 2024, 03:11:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"ये ग दिवाळी, तुझं पणतीने मी स्वागत करते,
रहा माझ्या जवळी, तुला आनंदाने उजळताना मी पाहते."

ये ग दिवाळी
तुझं पणतीने मी स्वागत करते
रहा माझ्या जवळी,
तुला आनंदाने उजळताना मी पाहते.

तारांगणात तारे चमकतात
तुझ्या येण्याची चाहूल देतात
संपूर्ण घरात तुझा प्रकाश,
प्रेम आणि सुखाची लहर पसरवतात.

दिव्यांच्या वर्तुळात अन लखलखाटात
धरतीवर तू वाजतगाजत येते
उत्सवाच्या या मंगल क्षणांत,
संपूर्ण हृदयात आनंद भरते.

तुझ्यासवे आलेला प्रकाश
तुझ्याबरोबर आलेला आनंद
स्वागत करतोय प्रत्येक जण,
तुझ्या येण्याने साजरे सारे क्षण.

ये ग दिवाळी, रहा माझ्या जवळी
तुझं स्वागत करते, अग दिवाळी
मला सुख, समृद्धी, भरभराट दे,
उजळताना तुला मला पाहू दे !

तुझ्या येण्याचा उत्सव साजरा होवो
उत्सवाची ज्योत मनामनात पेटत राहो
सर्वांच्या हृदयात तुझा प्रकाश,
आनंदाने तेवत, उजळत राहो !

--अतुल परब
--दिनांक-05.11.2024-मंगळवार.
===========================================