बघ, आज सारे दु:ख विसरून मी हसू लागले

Started by Atul Kaviraje, November 06, 2024, 08:22:31 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

"बघ, आज सारे दु:ख विसरून मी हसू लागले,
दिवाळी ये, तुझं आगमनचं यासाठी कारणीभूत झाले."

तुला पाहून उजळतात, जगाचे सारे रंग
सुखाच्या या क्षणात, विसरतात दुःखाचे रंग
तुझ्या आगमनाने बागेत फुलतात फुले,
तुझ्या येण्याने, मन माझे झुल्यावरती झुले.

तू आलीस म्हणून आज, हसणं झालं सोपं
दु:खाचे सावट मिटले, घेतलंय सुखाने रूप
तुझ्या सोबत साजरी करते, हा सण विशेष,
मनात भरलाय उत्साह, नवा जोश, नवा उन्मेष. 

तुझ्या सणात, नवे रंग भरून येतील
संपूर्ण बाग सजेल, फुलांच्या गंधात खेळेल
आनंदाच्या वाऱ्यात, येईल ताजगीचा थर,
सुखाच्या या क्षणात, मिळेल मनासारखं सारं.

बघ, आज सारे दु:ख विसरून मी हसू लागले
दिवाळी ये, तुझं आगमनचं यासाठी कारणीभूत झाले
या प्रेमाच्या रंगात, सर्वत्र सुख बागडतं,
तुझ्या सोबत दिवाळी, जीवन गाणं गातं !

--अतुल परब
--दिनांक-06.11.2024-बुधवार.
===========================================