जराशी उशिरा मला मौत यावी. गझल

Started by amit.dodake, January 01, 2011, 11:50:14 AM

Previous topic - Next topic

amit.dodake

असा जीवनाचा लळा लागला रे ...
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!

मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!

तिला साजणाची कधी याद यावी
तिचा एकटिचा असे मामला रे !!!

कधी सावली का तुझ्या दूर गेली ??
पळुनी असा तू कुठे चालला रे !!!

किती मी तुझी चाकरी रोज केली
प्रभू तू तरिही कुठे पावला रे !!!

जिच्या मी रुपेरी रूपाचा दिवाणा
तिनेही लटांनी गळा कापला रे !!!

जराशी उशिरा मला मौत यावी
तिने कुंकवाचा टिळा लावला रे !!!

अभिजीत नागले.source - orkut