दूरावा म्हणजे प्रेम..

Started by prachidesai, January 01, 2011, 04:19:07 PM

Previous topic - Next topic

prachidesai

दूरावा म्हणजे प्रेम...अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम...दूराव्यात असते आठवण...अन, ऒलाव्यात असते ती साठवण...दूराव्यात अनेक भास असतात...अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..दूरावा असह्य असतॊ...ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...दूराव्यातही असावा ऒलावा...पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा...दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...unknown