येऊ दे ...

Started by स्वप्नील वायचळ, January 03, 2011, 02:55:32 PM

Previous topic - Next topic

स्वप्नील वायचळ

                         येऊ दे ...

येऊ दे ...सुचू दे ....विचारांची साखळी माझ्या लागू दे
येऊ दे ...सुचू दे ....सप्तस्वरातील कविता मजला स्फुरू दे  || धृ ||

प्रत्येकाला तोच रे दिसतो ....सूर्य नभामधी
पाहण्याचा दृष्टीकोन ठरवी ....कोण आहे कवी
निसर्गात भान हरपूनि  ....मग्न जो कुणी होई
सरस्वतीचा पुत्र म्हणविसी ....कीर्ती ज्याची भुई || १ ||

कल्पनेच्या दुनियेमधला ....राजा आहे कवी
साध्या सोप्या गोष्टींमधुनी ....काढे कल्पना नवी
शब्दरुपात व्यक्त करवितो ....भावना ज्या मनी
देवकृपेने अद्भुत अशा या ....प्रतिभेचा तो धनी || २ ||

                               -स्वप्नील वायचळ

amoul

छान कविता आहे स्वप्नील , आवडली खूपच
हि ओळ तर मस्तच आहे

पाहण्याचा दृष्टीकोन ठरवी ....कोण आहे कवी


rudra


स्वप्नील वायचळ

धन्यवाद मित्रानो