मनमोर...

Started by Vkulkarni, January 03, 2011, 05:45:37 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

  खिडकीच्या गजांवर येऊन थांबलेले,
  लाघवी मेघदूत,
  खिडकीबाहेर रंगलेला.....
  बेधुंद जलधारांचा विलक्षण नर्तनसोहळा...!
  नेमक्या त्याच वेळी,
  तुझ्या निद्रीस्त चेहर्‍याला
  व्यापून राहिलेल्या लडिवाळ बटा....!
  .....
  .....
  हे सगळं अनुभवण्यासाठी...
  अवघे दोनच डोळे .... ?
  अं ह... आता ते दोन्ही डोळेसुद्धा मिटले आणि...
  आणि फुलवला पिसारा मनमोराचा....!
  ....
  ...
  सगळ्या अंगांगाला फुटलेत लक्ष लक्ष डोळे ...
  आणि सुरू जाहला,
  एक अलौकिक सोहळा........!

  विशाल