बावरा हा जीव बावरा

Started by pomadon, January 05, 2011, 01:03:13 AM

Previous topic - Next topic

pomadon

चित्रपट : क्षणभर विश्रांती
गीत : बावरा हा जीव बावरा
स्वर: ऋषिकेश कामेरकर,अवधूत गुप्ते,शिल्पा पै,जान्हवी प्रभू-अरोरा


प्रेम रंगात रंगुनी, प्रीत झणकारते मनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा  ॥  धृ ॥
ना तुला बोलवे, ना मला बोलवे
नयन हे बोलती एकमेकांसवे
धुंद गंधात न्हाउनी, गीत ये आकारुनी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा  ॥  १ ॥
जीव आसावला, कंपने  हि नवी
ऐकू येते उरी, स्पंदने हि नवी
स्वप्न डोळ्यात देखुनी, साज छेडीत ये कुणी
अंतरंगात ऐकू ये सादं होतसे जीव हा
बावरा हा जीव बावरा  ॥  २  ॥