सरीची आस

Started by Sachish, January 06, 2011, 08:32:23 AM

Previous topic - Next topic

Sachish

सरीची  आस


उन  फार झालंय

तन मन जळतंय

तहानही लागलीये

कासावीस होतंय



वाट बघतंय वाऱ्याची

सुखद नि आल्हाद

हवा हवा वाटे

सावलीचा तो प्रसाद



सरीची आस

ओलाव्याचा ध्यास

तहान भागवायला

पाण्याची बरसात


डोळ्यांना हवा


हिरवागार गालीचा

मऊ मऊ थंड

शत्रू जणू आगीचा


चातकाची ओढ

पाऊस घनघोर

काळ्या काळ्या ढगासाठी

नाचे मनमोर
[/b]

डॉ.श्रद्धा दिवेकर  माने or Sachish[/b][/size][/color]


rudra

v.good....................... :( ...................................... 8)