पहाटे पहाटे तुला जाग आली[

Started by prachidesai, January 06, 2011, 07:31:30 PM

Previous topic - Next topic

prachidesai

पहाटे पहाटे तुला जाग आली

(कविश्रेष्ट सुरेश भट यांची माफी मागुन ...एक पहाट अशीही.....)

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेनाकिती घालु कानी,
बोळे ते कळेना असा राहुदे हात, माझ्या कानाशी ...!!

म्हणू घोरणे की, फुस्कारने यालाकर्कश बेसुरांची,
जणू पुष्पमालाभिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!

जरा तान घे तू, ताण दे घशालामग मच्छरदाणी,
ऑलाउट कशाला ?फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!

तुला जाग ना ये, मला झोप ना येभगवंत माझा,
कसा अंत पाहेझोपही अताशा, चकनाचूर झाली ...!!

-गंगाधर मुटे



गंगाधर मुटे

पहाटे पहाटे तुला जाग आली

पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली.......!!

तुझे घोरणे ते, मला सोसवेना
किती घालू कानी, बोळे ते कळेना
असा राहू दे हात, माझ्या कानाशी ...!!

म्हणू घोरणे की, फुस्कारणे याला
कर्कश बेसुरांची, गुंफ़ितेस माला
भिऊनी आलापा, उंदीरे पळाली ...!!

जरा तान घे तू, ताण दे घशाला
मग मच्छरदाणी, ऑलाउट कशाला?
फुकटात सारी, मच्छरे पळाली ...!!

तुला जाग ना ये, मला झोप ना ये
भगवंत माझा, कसा अंत पाहे
अभय झोप सारी, चकनाचूर झाली ...!!

                                      गंगाधर मुटे
..................................................................
बळीराजा डॉट कॉम
http://www.baliraja.com/

mady108

सर्वात मोठा मुर्खपणा.. एक मुलगा ब्लेड ने त्याच्या गर्लफ्रेंड चे नाव हातावर लिहितो आणि
.
.
.
.
...... .
.
.
. .
.
.
....
.
.
..
..
..
..
.. स्पेलिंग mistake होते..