@@ मोरपिसं @@

Started by दिगंबर कोटकर, January 13, 2011, 03:18:51 PM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

मोरपिसं.......!!!     

या आधी मी, तुझ्यासंगे, 
का ? ग केलं असं...!!! 
उभार ज्वानीचा, अंगावरी, 
फिरवी मोरपिसं.......!!!     

अज्ञान मी ग, अजाण होतो, 
होती न कसली जाण, 
ताकावर्ती भागवत होतो, 
मी ग दुधाची तहान...!!!     

अब्रू तुझी ग, लाखमोलाची, 
माझ्यापाशी ग होती, 
माझ्यापासून तुला वाटली, 
नाही कसलीच भीती...!!!     

मोडून बंधन, तोडून विश्वास, 
खुडली मी ग कळी, 
तुझी ग अब्रू, माझ्याहाती देत, 
झालीस तू मोकळी....!!!       

^^^ दिगंबर ^^^