~~ जमात ~~

Started by दिगंबर कोटकर, January 13, 2011, 05:17:52 PM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

~~ जमात ~~[/size]
भिनुनी अंगी जलवेग,
पडण्या जातीयतेत छेद,
दिली टक्कर, आवरेना वेग,
पाठविण्या जातीस रसातलात,
निघाली कोणती जमात.... ?

घेऊनी हाती वज्राघात ,
सरसावती तयांचे हात,
मोजण्या जातीयतेचे दात,
खुपसण्या खंजीर तिच्या ऊरात,
निघाली कोणती जमात.... ?

घेऊनी अग्नीचे पंख,
भेदण्या जातीची भिंत,
सांगण्या मनातील खंत,
नाही तया उसंत,
निघाली कोणती जमात.... ?

न पाहिला दिवस अन रात,
करुनी जातीवर आघात,
केला जातीचा घात-पात,
काढण्या जातीस या मोडीत,
निघाली कोणती जमात.... ?

मोडण्या जातीयतेची कमान,
खुडन्या गर्वीष्ठांची मान,
मिळविण्या मानवतेचा सन्मान,
करितसे जीवाचे या रान,
घेऊनी सर तळहातात,  निघाली कोणती जमात.... ?

न कुणाचीच भीती,
न कुणाची हि पर्वा,
पिकावी सर्वत्र मानवता,
अन व्हावा शिवार हा हिरवा,
मोडुनी जातीयतेचे मळे,
खळखळावे एकात्मतेचे तळे,
हीच स्वप्ने रे बघती,
ती निघालेली जमात,
निघाली कोणती जमात........?
                                                दिगंबर.....[/i][/b]  [/size]

swapneel.k