हा गारवा

Started by Jai dait, January 14, 2011, 01:10:33 PM

Previous topic - Next topic

Jai dait

स्पर्श तुझ्या हाताचा, 
झाला असा, मी मोहरलो   
तुज्या नावे माझे सारे   
हा जीव माझा, मी तो हरलो     

या धुंद तुझ्या मिठीत   
विश्व मला सापडते 
तुझे-माझे विश्व एकच 
हे स्वप्नं असे का पडते?     

तू जवळ असावी अशीच 
स्पंदने हेच सांगती 
दूर जाता तू मजपासून   
बघ कसे थांबती..     

हा हृतू, हा गारवा 
आणि तुझी उबदार कुशी 
तुझ्याच आडोशाला सुख-दु:खे   
अन स्वप्नांची मी केली उशी     

घे पांघरून ही दुलई 
आणि हरवून जा तू शांत   
स्मित तुझ्या चेह-यावरचे 
मी टिपून घेईन निवांत

--जय


vandana kanade

अतिशय सुंदर. :)