ती धरती .........

Started by दिगंबर कोटकर, January 16, 2011, 12:49:30 PM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

ती धरती .........     
ते आंगण आणिक, माझे तन-मन, 
अवघे प्रीतीने न्हाले, 
हे विरही वादळ, दु:खी जीवन, 
का? माझ्या प्राक्तनी आले.....     

ती धरा आणिक, माझे तन-मन,   
अवघे प्रीतीने न्हाले, 
हे काटे विखारी, फुल उदासी,   
का? माझ्या जीवनी आले.....     

ते आभाळ आणिक, माझे तन-मन, 
अवघे प्रीतीने न्हाले, 
ही उष्टी लक्तरे, कष्टी जीवन,   
का? माझ्या नशिबी  आले.....     

ती प्रेयसी आणिक, माझे तन-मन, 
अवघे रक्ताने न्हाले, 
हे जीवन आमुचे, आम्हां दोघांचे, 
का? असे लयाला गेले.........!!!!!                             

दिगंबर.........  

rudra