कोशात जगणारी माणसे

Started by sulabhasabnis@gmail.com, January 18, 2011, 04:14:46 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

  कोशात जगणारी माणसे
सुरवंटाची अळी भोवती कोश विणते   
विसरून जगाला त्या कोशातच जगते 
खाऊन खाऊन सुस्त झोपूनच राहते 
पुरी वाढ झाल्यावरच ती बाहेर येते
बाहेर आल्यावर ती खूप खूष असते 
तिचे सुंदर फुलपाखरू झालेले असते 
माणसाचे मात्र असे काहीच का नसते 
कोशात जगणाऱ्याना तीच सवय होते 
पूर्ण वाढ त्यांची का कधी होतच नसते?
कोश फाडायची  त्यांना इच्छाच नसते? 
त्यांच्यासंगे जगणाऱ्यांचे कठीण असते
त्यांना असे कोशात जगता येत नसते 
त्यांना जर कोश फडता आले असते-- 
खरेच का तेही फुलपाखरू झाले असते--?                   -------------             

santoshi.world

agree with u mam ..... mi pan ashich mazyach koshat jagnari ahe ... ani tyacha mazya aajubajuchya lokana khup tras hotoy :P