समज-गैरसमज

Started by mrudugandha, January 23, 2011, 03:29:28 PM

Previous topic - Next topic

mrudugandha

समज गैरसमज यांत खुप फरक असतो
अनावश्यक विचार हजर, मुळ मुद्दा गैरहजर असतो
तो का असे बोलला, ती का अशी वागली?
उगाचच नसत्या विचारांची चालते जुगलबंदी!
शंका-कुशकांचे मग हळु हळु सुटते वारे,
गुलाबाच्या फुलाचे दिसु लागतात फक्त काटे!
भावनांच्या लाटा होतात वर-खाली,
रडून-रडून डोळ्यातले संपुन जाते पाणी!
भुक नाही लागत, झोप जाते उडून,
साध्य काहीच होत नाही उगाच मनाला छळुन!
चिडचिड, राग, भांडण, शांत अबोला
"माझी चुक नव्हतीच" वर असा तोरा!
वेळ अशी येता करावी नामी युक्ती,
शहाणपणाने वागण्याची मनाला करावी सक्ती!
मग थोडं थांबुन निट विचार करावा,
चुक-भुल देउन-घेऊन, संवाद साधावा!

mrudugandha.

prashantds