कल्पना...!

Started by Swamiji, January 26, 2011, 07:24:12 PM

Previous topic - Next topic

Swamiji

   
कल्पना.....!
[/size]
[/size]
कशी  मान वेळावुनी लाजताना
[/size]
मना  माझिया वेड हे लावते तू,
[/size]
उगा  झाकुनी पापण्यांची कवाडे
[/size]
हळू  पाहता संभ्रमी टाकते तू..
[/size]
[/size]
जरी  चालशी चोरट्या पावलांनी
[/size]
तुझ्या  चाहुलीने असा कंप होतो,
[/size]
मनी  गांगरावे, न काही सुचावे
[/size]
दिसेना  तरीही तुझा भास होतो..
[/size]
[/size]
तुझा  केशसंभार जादूगिरी ही
[/size]
असूनी  खुला तो मना गुंतवीतो,
[/size]
कधी  केस ओले, हवा आर्द्र होते
[/size]
सुगंधात  झोका मना गुंगवीतो..
[/size]
[/size]
तुझे  गाल गोरे, परी त्यावरीची
[/size]
खळी  का असे हीच तक्रार आहे,
[/size]
खिळूनी  बसे दृष्टि तेथे पुन: ती
[/size]
ढळेना  म्हणूनीच बेजार आहे..
[/size]
[/size]
नसे  लक्ष माझे तसे वेधण्याला
[/size]
उगा  येरझाऱ्या कशी मारते तू ?
[/size]
कधी  एकटी पाहुनी मी खुणावी
[/size]
बहाणा  नवा शोधुनी टाळते तू..
[/size]
[/size]
उगा  अंगठ्याने भुई टोकरावी
[/size]
उगा  ओढणी सारखीशी करावी,
[/size]
तुझे  गोड चाळे पहाणार नाही
[/size]
अशी  पैज माझीच मी का हरावी ?
[/size]
[/size]
अशी  कोण वाटेत आलीच नाही
[/size]
कधी  मी कुठे पाहिलेलीच नाही,
[/size]
उगा  स्वप्न ऐसे मनी राहिले ना
[/size]
तरी  मी कवी शब्द गुंफीत राही...!
[/size]
[/size]
ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(भुजंगप्रयात)
[/size]
- स्वामीजी १८-१२-२०१०

rudra

pranam swamiji farach chan lihita tumhi....
suomy pratiche lekhan aahe tumche....
far mahinyani alat MK var............ :)

santoshi.world


Lucky Sir

उगा  अंगठ्याने भुई टोकरावी
उगा  ओढणी सारखीशी करावी,
तुझे  गोड चाळे पहाणार नाही
अशी  पैज माझीच मी का हरावी

'SWAMIGIRI' awadli bua aplyala! UGA nahi... KHARECH>>>>>

amoul

अशी  कोण वाटेत आलीच नाही
कधी  मी कुठे पाहिलेलीच नाही,
उगा  स्वप्न ऐसे मनी राहिले ना
तरी  मी कवी शब्द गुंफीत राही...!

khup aavadali kavita tumchi

sanjiv_n007