"स्त्री.."

Started by charudutta_090, January 27, 2011, 08:00:00 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"स्त्री.."
किती ग गैरसमज करतेस माझ्या स्त्री करिता असलेल्या भावनान बद्दल.
कसं सांगू तुला स्त्री म्हणजे मला काय वाटतं.....हे सांगणं खरच अवघड आहे..कारण स्त्री म्हणजे कुठल्याही शब्दां पलीकडे आहे..
तिला कुठल्या शब्दांमध्ये बांधून ठेवणं अशक्य आहे.तरी तू आग्रह धरतेस कि मी सांगाव स्त्री म्हणजे मला काय वाटतं...तर ऐक...
अवघी ब्रम्हांडाची निर्मिती म्हणजे 'स्त्री',
या विश्वाची प्रकृती म्हणजे'स्त्री';
अंतराळात सर्वात प्रबळ ती धरणी म्हणजे 'स्त्री',
भौगोलिक विश्वातली नित्य शुद्ध गंगास्वरूप म्हणजे'स्त्री';
मनु निर्मित हि भूमी भारतमाता म्हणजे'स्त्री',
शिवात्वाची अर्धांगिनी शक्ती म्हणजे 'स्त्री';
पुरुषाच्या पुरुषत्वाची चेतना म्हणजे'स्त्री',
प्रणय रांगातली रसना म्हणजे'स्त्री';
त्याच रस्नेतून रुपांतरीत होणारी वासना म्हणजे'स्त्री';
प्रियकराला लावण्यातून मोहित करणारी प्रेयसी म्हणजे 'स्त्री',
आजन्म त्याचा साथ देवून त्याला तळहाती फोडाप्रमाणे जपणारी पत्नी म्हणजे 'स्त्री';
त्याच्या बीजांना जोपासून वौंश अंकुरित करणारी माता म्हणजे 'स्त्री',
जन्मापासून मोठा होई पर्यंत,लेकराला सुसौन्स्कारित नागरिक बनवणारी आई म्हणजे'स्त्री';
घराण्याची अब्रू जपणारी गृहलक्ष्मि  म्हणजे'स्त्री',
आजन्म विद्यार्थी असणार्या माणसाची विद्या- सरस्वती म्हणजे'स्त्री';
प्रपंच सुखाची धनदेवता, लक्ष्मि म्हणजे'स्त्री',
खरी वा खोटी,उजवी वा डावी सगळ्या मार्गाची दिशाबाजू म्हणजे'स्त्री',
वेळ पडल्यास पाप,आसुर सौंहारक होणारी चंडी म्हणजे'स्त्री',
कुमार्गी असलेल्या बुद्धीविनाश्यांची आपत्ती,विप्पत्ती म्हणजे 'स्त्री';
इतके आगळे अगणित रूपे असून स्वतःला लज्जित ठेवणारी लाज,शालीनता म्हणजे'स्त्री',
स्वतः ब्राम्हांडीत शक्ती असून,विनयाने शिवात एकरूप होणारी विलीनता म्हणजे'स्त्री'.......!!!!!!!!!!
चारुदत्त अघोर.(दि.२७/१/११)

amoul

kharach kiti mast lihitos yar tu !! aavadli hi kavita sudhha!!

rudra

agdi karay  ................. 8)