चांदणप्रीती

Started by sulabhasabnis@gmail.com, January 28, 2011, 10:19:24 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

        चांदणप्रीती
जीवन जगण्याची उर्मी देतात
तुझ्या डोळ्यातील स्नेहज्योती
उदास  मनाला   तोषवितात   
हास्यातून ओघळणारे मोती
जिवाचा  शीण  निवारतात
सुमधुर सूर तुझ्याच गीती
ताणतणाव सर्व शमवतात
शब्दातील आश्वासक शक्ती
अंधारवाटा  ही उजळतात
बरसता तव चांदणप्रीती       
       -------------