धन्य भारत भूमी.

Started by charudutta_090, January 30, 2011, 07:12:34 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं
धन्य भारत भूमी.
सात जन्माचे पुण्य असता,होते भरतखंडी जनन,
यास म्हणती देव भूमी ,जिथे चिरकाल सौन्स्कृती जतन;
जिथे चारही वेद ज्वलंत राहून रोकती पाप पतन,
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.

नित्य मनी वास तुझा,राहो चित्ती,आत्मि सदैव मनन,
शिर भांग उतरो चरणी तुझिया होऊनी नमन;
विरक्तीस ,आसक्तीत करून ,होवो श्वास गमन,
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.

कण कण या मातीचा ,शक्तिमान,जणू जप,यज्ञ होम-हवन,
थेंब थेंब  इथला तीर्थरूप,जो कधीही करावा सेवन;
जिला पूर्व दिशा लक्षून,सुर्यानेच आश्रयले अच्छादुनी गगन,
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.

जिथे ब्रम्हा ,विष्णू,महेश एकवटले राहुनी अभिन्न,
ज्यांच्या नामस्मराणानेच होते  दुष्कार्माचे  क्षालन,
दत्तारूपी पंचावतारून हर काळात केले भक्तास प्रसन्न;
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.

निसर्ग  सौंदर्याची परिसीमा गाठलेले तुझी क्षेत्रे विभिन्न,
हरेक भक्तास गोडी प्रसादाची,सोडून पंच पक्वान्न;
सुखावती प्रत्येक जीव, घेऊन ओंकरीत निष्पन्न,
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.

सत्कर्मित बुद्धी राहो व अध्यात्मिक चारित्र्य चलन,
शुद्ध वृत्ती प्रज्वलित राहो,दुरावून वृत्ती मलीन;
गुरु सेवेत जीव जडो,अंती होऊन तुझ्यात विलीन;
धन्य हि भूमी गुरुदत्ता,राहो मनस्वी तुझेच चिंतन.
चारुदत्त अघोर.(दि.२०/१०/१०)