मी तो उनाड पक्षी.....

Started by दिगंबर कोटकर, January 31, 2011, 10:08:49 AM

Previous topic - Next topic

दिगंबर कोटकर

       
  [/t] 
    मी तो उनाड पक्षी.....           
   
   
   
   मी तो उनाड पक्षी.....






पंख पसरून, पाश झुगारून,


झेपावतो आकाशी,


मी तो उनाड पक्षी.....






घिरट्या घालतो, सावज शोधण्या,


या विराट गगनी,


मी तो उनाड पक्षी.....






सावजावर लक्ष, बनविण्या भक्ष,


विहरतो व्योमातुनी,


मी तो उनाड पक्षी.....






वादळ वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,


पाखरण पिलांवर, धरतो पंखांची,


मी तो उनाड पक्षी.....






डोंगर दऱ्यातुनी, उडतो गगनातुनी,


सागर किनाऱ्यावरून, फेरफटका भक्ष्यासाठी,


तरीपण ओढ पिलांची, घरट्याकडे येतो मी विश्रांतीसाठी,


बसतो झाडांच्या फांदीवर,


मी तो उनाड पक्षी.....






दिगंबर
[/t]