प्रेम असावं

Started by gojiree, February 01, 2011, 11:53:47 PM

Previous topic - Next topic

gojiree

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र
जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शूभ्र

मावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव
सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीव

सागरासारखा अथांग असावा विश्वास
दुसर्‍यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास

हातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण
अलगद हात हाती येतो सलते एक आठवण

मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती
अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

Lucky Sir