सुगंध माझा लपेल का?

Started by gojiree, February 02, 2011, 12:51:15 AM

Previous topic - Next topic

gojiree

असेन जरी मी फूल कोवळे,
सुगंध माझा लपेल का?

दरवळेल तो त्रिभुवनी, गगनी
कणा- कणांत राहिल भरूनी
ओढ तयाची भिरभिरणार्‍या
पक्षा एका नसेल का?

रूप पाहूनी होईल मोहित
भ्रमर कुणी चपल, अपरिचित
इन्द्रधनूचे रंग पांघरुनि
फूलपाखरू हसेल का?

सुवास माझा सुखाविल मना
व्यापुनि राहिल दाही दिशांना
शहारुनी मम शुभ्र पाकळ्या
समीर त्यासी जपेल का?

Jai dait


amoul

sudar sabd mandani aahe, vachata suddha ek lay yete

apratim!!