पाऊस आणि मन

Started by gojiree, February 02, 2011, 01:16:39 AM

Previous topic - Next topic

gojiree

पाऊस पाहत राह्ण्याची मजा
पावसात भिजणार्‍यांना कधी कळणारच नाही
घट्ट मिटलेल्या डोळ्यांत जपलेला अश्रू
गालांवर कधी ओघळणारच नाही
 
काल घडलेल्या सार्‍या गोष्टी
आज उगीच आठवत राह्तात
डोळयांनी वाट करून दिली तरी
उगीच पाणी साठवत राहतात

पुसून टाकावी, वाटतं, करावी
पुन्हा कोरी करकरीत पाटी
पण मनाची खळगी पोकळ
अन् आठवणींची पेंसिलही खोटी
 
आता मनाला सवय झली आहे
रोज ग म भ न गिरवायची
स्वत:ची फोल फुशारकी
स्वतःसमोरच मिरवायची
 
यंदाच्या पावसाळ्यात, वाटलं होतं
पाटीवरची अक्षरे पुसली जातील
पण बहुदा पावसाला वाटलं असेल
पाटीमुळे आपले शुभ्र थेंब काळे होतील