नातं तुझं नि माझं. (चारुदत्त अघोर..दि.१/२/११)

Started by charudutta_090, February 02, 2011, 01:56:39 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई
नातं तुझं नि माझं. (चारुदत्त अघोर..दि.१/२/११)
एक नाजूक रेशीम धागा,ज्याचं कसलंच नाही ओझं,
मैत्री,प्रेम,सर्व अंग असलेलं,नातं तुझं नि माझं.
जणू आकाशरूपी प्रभाती बाहूत,एक उषःकाली नीरज,
श्रुन्गारसरी बरसण्यास अधीर,जिला रोकता मेघरूपी धीरज;
दैवाशिर्वादित नातं आपलं,जिच्या अतूटतेला नाही कसलीच सोड,
कीनाररूपी आसं तू,माझ्या सागररूपी लाटांची जिला ओढ;
ह्या नात्याला नाही कसलीच व्याख्या,न काही उदाहरण,
एक धरणीरूपी तू,जिला माझे गगनाच्छद्दीत आवरण;
एक सरसरती पानगळ,जिची तू गोड अवीट कुझबुझती बडबड,
काळीजरूपी मी ज्याच्यावाचून,नाही शारिरी कोणतीच धडधड;
असं नातं ज्याला न नजरवेध,न संवेदना,फक्त एक अतूट विश्वास,
ज्याच्या मजबूत गाभित पायावरच एकमेकांचा वचनीत आश्वास;
एक विद्या वीणा संगीतीत नातं,भावना जिच्या स्वर तारा,
वसंतरूपी एक आसुसला प्रियकर,प्रेयसी ज्याची श्रावणधारा;
शरीर,बुद्धी,मन एकीत हे नातं,जे भासून फक्त वाटत असतं,
बंधन रहित मुक्त सागरी वादळ,ज्याला कोणीच अडवत नसतं;
नाजुक कोवळं एक मोर पंख ,ज्याच्या स्पर्शानं असतं शहराणं,
एक भ्रमर,ज्याच्या झुणझुणतेनेच,टप्पोर्या कळीला असतं बहरणं;
तळमळीत नातं हे ,जे जपण्यास आजन्म असतं फक्त खपणं,
नाजूकतेची नाजूकता ही,ज्याला अखेर श्वासापर्यंत जपणं;
म्हणूनच सांगतो गं...
एक नाजूक रेशीम धागा,ज्याला नाही कसलं ओझं,
मैत्री, प्रेम,सर्व अंग असलेलं,नातं तुझं नि माझं.....!!!
चारुदत्त अघोर.(दि.१/२/११)