कोणी समजू नाही शकत .

Started by charudutta_090, February 08, 2011, 08:29:58 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई
कोणी समजू नाही शकत .
कितीही ओरडलं,तरी कोणी ऐकू नाही शकत,
फाडल्या जीवाला,कोणी शिवू नाही शकत,
काही पटवलं,तरी कोणी उमजू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

भुक्या जीवाला कोणी अन्नावू नाही शकत,
कोरड्या रसनांना कोणी ओलावू नाही शकत,
पुरावल्या वासनांना,कोणी तृप्तावू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

बुद्धीत विचारांना कोणी मार्गावू नाही शकत,
मनातल्या अंगणाला,कोणी सडावू नाही शकत;
कोवळ्या हृदय पालवीला,कोणी दवू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

या मखमली काट्यांना,कोणी स्पर्शावू नाही शकत,
या सुन्या बाहूत कोणी विसावू नाही शकत;
एक शृंगारीत थेंब,कोणी पाजवू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

या प्रेमित तहानल्याला,कोणी पाणावू नाही शकत,
सुन्या चंद्राला कोणी रात्रवू नाही शकत;
एक चांदणी,सखिरूपी,प्रीतवू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

सदैव एकल्याला कोणी मित्रवू नाही शकत,
उकडीत मनाला कोणी वारवू नाही शकत;
स्वप्नरूपी विणीत धाग्याला,कोणी उसवू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.

मुक्या मुखाला कोणी बोलवू नाही शकत,
अटक्त्या श्वासाला कोणी दिर्घावू नाही शकत;
काहुरीत डोकं मान्डवून,कोणी थापडू नाही शकत,
माझ्या भावनांना कोणी समजू नाही शकत.
चारुदत्त अघोर.(दि.६/२/११)