"काव्य-अपत्य "

Started by charudutta_090, February 12, 2011, 06:07:31 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई
"काव्य-अपत्य "
एक ऋतू चक्र जे मला कायम असतं हरवत,
वैचारिक काहूर जे खड्काळून रचतं पर्वत;
मुठी एवढं मन,जे संपूर्ण जगच व्याप्तं समावत,
अनमोल शब्द हिरे, असतं जे निवडून,कमावत;
वेचून नाजूक कल्पना,जे काचरुपी फुटतं तडवत,
काही आकस्मिक,जे मित्ररूप जिवलग दगावून बसतं रडवत;
ते मृगजळाचं पाणी,स्वप्नीत दुनिया दर्शावतं आरसावत,
ते भावना ढग,जे ओलावतात श्रावणधारा बरसावत;
कोस एकरीत दूर बाग,जे उमलतं मखमली गालीचा खुलवत,
तीच काव्यरूपी कळी,जे दवून उमलवतं फुलवत ;
काही अनमोल पळ,येतात पाउली आनंद धनवत,
कोणी जीवलग अनोळखी मित्र,त्याला हृदयी वसवतं मनवत;
कधी श्रुगाणून लाटावतं,सागर किनारी उसळत,
कधी हरवल्या मित्राकरिता,बसतं आठवणी मसळत;
नाजूक सख्यास्पर्शी,अंगतं शहारे खड्वत,
विरहित काव्य-विमान,आसमानी पंखावतं उडवत;
काल्पनिक उष्मात,शुभ्रीत मोगरा,दिर्घावून श्वास्त,सुवासत,
कुंपणतं,काव्यरूपी अंगण,जपून कवित्वाची रियासत;
काळिजून काहीच काळ,कोणी गोड मित्र,हरवून बर्फावतं शहारत,
नियतीची करणी,म्हणून बसतं एकलून,आठवणी सावरत;
हेच ते क्षणभंगुर मन,जे दुखित धागा जंजाळ कधीच नाही उसवत,
खरंच,आंतरिक वेदना बोचाल्याशिवाय,काव्य-अपत्य कधीच नाही प्रसवत......
चारुदत्त अघोर.(११/२/११)