"उन्हाळा"

Started by charudutta_090, February 13, 2011, 09:53:29 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई.
"उन्हाळा"
नुकताच शितवारा परतून,उष्मवारा चाहुलला होता,
आपल्या उन्हाळीरूपी रुतूस,संगतीस घेऊन पाउलला होता;
झाडं सर्व पाने गाळून जशी सापळारुपी रुक्षावून सूकावली होती,
जणू काही थेंब पाणी व काही कणी अन्ना करिता भूकावली होती;
चंद्रच काय तो रात्रीस थंड लहर पसरून वातावरणास कुरवाळत होता,
थोड्या शीत प्रहरी अंगणी,ओल्या सडी मातीचा सुगंध दरवळत होता;
आंब्या टोकि मोहर आकार घेऊन,थोडा सुपारला होता,
आपल्या ओल्या कच्च्या सुगंधी,कैरीस आकारून टप्पोरला होता;
काही कैर्या बाळस्वरुपीच टपकून पडत होत्या,
जशा मीठ लावून चटकायसाठीच,गळुन झडत होत्या;
तरी कुठेतरी हरवलेलं अस्थिर मन,विचारांनी बावरत होतं,
सगळ असून काहीतरी कमी आहे,यासाठी कावरत होतं;
तिन्ही प्रहर संगतीस घेऊन,संध्या केशरीरंगी सांजत होती,
शुभ्र चादरी गच्चीत निजून,हरवली नजर नभी चांदण्या मोजत होती;
कुठून तरी एक सुगंधित दरवळ,माझ्या भोवतिस पसरली,
बेभान करून चीत्तीस,जणू प्रणयरुपी मनात असरली;
तो सुगंध भोवती माझ्या,झोपवून मला मंडळला होता,
कोकीळ हाकेस कडी वळलो,तर एक गजरा पळसपानि  गुंडाळला होता;
इतक्या ताज्या कळीस येवून जसा माझी सकाळ तोच प्रहरत होता;
माझ्याच ओठ्दाती धागा उसवून,सर्व कळी खुलवून बहरत होता;
कोण जाणे इतक्या गर्मीत असा थंडावा,एखाद्यानच घ्यावा,
पण इच्छित मन सुगंधले कि असा उन्हाळा वारंवारच यावा....
चारुदत्त अघोर.(दि.११/२/११)