माय तूच होतीस ना !

Started by firoj mirza, February 16, 2011, 03:21:01 PM

Previous topic - Next topic

firoj mirza

मी शिकावं शिकावं ,
नि खूप मोठ व्हाव ,
मनी बाळगून हे सपान ,
त्या काळीत राबणारी ,
माय तूच होतीस ना !,

मी चमकाव चमकाव,
त्या सूर्याच्या समान ,
त्या कडाडत्या उन्हात ,
राबणारी वाघिणी,
माय तूच होतीस ना !,

मी रहाव नेहमी,
त्या गार गार सावलीत ,
अंगार मातीत त्या ,
अनवाणी राबणारी,
माय तूच होतीस ना !,

सुख माझिया जीवनी ,
राहावे नेहमी नेहमी ,
उरी बाळगून हे सपान ,
दुख जन्मभर सोसणारी,
माय तूच होतीस ना !,

काटा रूतता या पायात,
अश्रू उभे तुझ्या डोळ्यात,
मजसाठी दररोज,
त्या काट्यातन चालणारी ,
माय तूच होतीस ना !,
                               फिरोज मिर्झा....