"निळ्या आकाशाखाली सूर्यफूल फुल्ल ब्लूम"

Started by Atul Kaviraje, December 20, 2024, 04:55:41 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

शुभ दुपार,  शुभ शुक्रवार.

"निळ्या आकाशाखाली सूर्यफूल फुल्ल ब्लूम"

निळ्या आकाशाच्या गडद निळ्या रंगाखाली
सूर्यफुलांचा बगिचा सुवासिक सुगंधात
सोनेरी किरणांत उभे  राहीलेय सूर्याच्या,
सुख आशा आणि उंचावतील असा नवा आकार !

सूर्यफूल चमकते, आकाशातील सूर्याकडे वळते
प्रत्येक फुलात आनंद आणि प्रकाश दिसतो
वाऱ्याची हलकी गोड लहर फुलाला झुलवत रहाते, 
नवा उत्साह आणि उमेद देत रहाते.   

प्रकाशात रंगतात ती पिवळी रंगाने
सूर्याचा सोनेरी अंशच जणू त्यांच्यात असतो
एक एक पिवळी पाकळी सजते सुंदर,
परागसिंचना भ्रमर भिरभिरतो फुलावर.         

सूर्यफूल बाग जणू एक प्रेरणा आहे जीवनाला
वाऱ्यावर डोलणारे सूर्यफूल आहे एक आदर्श आयुष्याला
सूर्य दिसताच फुलाने मान वर केली, 
प्रत्येक ऋतून सूर्यफूल फुलते निळ्या आभाळाखाली  !

वाऱ्याचा खेळ, निसर्गाचे सुंदर सूर
आकाशी सूर्याची किरणे पसरतात दूर दूर
सूर्यफूल फुलत रहाते, झुलत रहाते, 
गंध आणि रंग दूरवर पसरवत रहाते !

दुर्लक्षित असले तरी, सूर्यफूल तेजाचा प्रवास करते
वर्षभर ते फुलत असते, जगत असते 
सोनेरी सूर्यफूल शिकवून जाते मुक्त जगणे,
या निळ्या आभाळाखाली सतत फुलत रहाणे. 

--अतुल परब
--दिनांक-20.12.2024-शुक्रवार.
===========================================