कैकदा

Started by firoj mirza, February 16, 2011, 03:28:10 PM

Previous topic - Next topic

firoj mirza

सवाल जरी आज न उठती ,
करी घायाळ ते कैकदा,

हुंदके जरी आज न येती,
उफाळे उरी ते कैकदा ,

आठवण जरी आज न येती,
हृदय कळवले हे कैकदा,

गंध तो जरी आज न येतो ,
भोवती दरवळे तो कैकदा

माणसे जरी आज भोवती ,
असतो एकटाच मी  कैकदा

बोललो जरी आज खूप काही ,
असतो अबोल मी कैकदा

झोपेची जरी तयारी आजची,
राहतो जागाच मी कैकदा

डोळ्यात जरी आनंद आजचा ,
रडून भिजतो मी कैकदा.
                     

फिरोज मिर्झा....
:)