इच्छा

Started by firoj mirza, February 16, 2011, 03:29:46 PM

Previous topic - Next topic

firoj mirza

आता जरासे कोठे
अश्रू  झाराया  लागले,
उरी दबलेले हुंदके
आत्ताच बोलाया लागले,

प्रश्नांचा भडीमार तो ,
मी प्रश्नातच गुरफटलेलो,
प्रश्नच का जीवनी,
उत्तर मिळाय लागले,

स्वप्न ते बेचिराख ,
पहिले कुण्या काळी,
रात्र ती वैरयाची ,
जागेच राहावे लागले,

सोडताना ती वाट,
मनी वादळे होती उठली,
नि परतुनी पाहतानाही,
स्वतःशीच भांडावे लागले,

अंधार माझ्या झोपडीत ,
अन इच्छा ती उजेडाची,
इच्छापायीच त्या लोकहो,
स्वतः जळावे लागले. 
                         :)  फिरोज मिर्झा.... :)