धडा

Started by mrudugandha, February 17, 2011, 04:22:45 PM

Previous topic - Next topic

mrudugandha

त्याचे नसणे त्याच्या असण्यापेक्षा चांगले आहे!
त्याला विसरणे त्याला आठवण्यापेक्षा सोपे आहे!
समजावले मी मनाला, म्हटले नाही तो आता!
हसुन उत्तर दिले मनाने, "नीट शोधले का माझ्यात त्याला"
अश्रुंनी धुवून काढला मग मी मनाचा तो कोपरा
गंध ही नको आहे त्याच्या आठवणींचा आता!
जगायचे त्याच्या शिवाय त्यात काय एवढे मोठे,
ह्रदय तर चालूच आहे जरी झालेत त्याचे तुकडे!
मित्र काय हो हवे तितके मिळतच जातात,
जवळचे बनून घाव करणारे काही "खास" असतात!
मैत्री करायची की नाही परत विचार नाही केला,
त्याच्याशी केलेल्या मैत्रीची, पूर्ण तर होऊ दे सजा!
विश्वास करावा मित्रावर, थोडा नाही अगदी पुरा,
मिळाला तर जवळचा मित्र मिळतो शेवटी
नाहीतर मिळतो कायमचा धडा!

mrudugandha.

vivekphutane

मिळाला तर जवळचा मित्र मिळतो शेवटी
नाहीतर मिळतो कायमचा धडा!
He sudha kahi kami nahi....

mrugjal

khup chan ahe, manatun lihleli diste

mrudugandha

hoy, kavita manatunach aali pahije nahi ka?
pratikriye baddle aabhar saranche! :)

santoshi.world

superrrrrbbbbbbbbbbb ......... mast kavita ........ mala khup khup avadali :)