पाऊस

Started by gojiree, February 19, 2011, 12:41:47 AM

Previous topic - Next topic

gojiree

बरेच दिवस मला पावसाने हेरले
पण एक दिवस मला पावसाने घेरले

पहाटे त्याची भूपाळी ऐकून मी उठले
थंड गार वार्‍यात मी पार गोठले

घराबाहेर पडण्याचा काहीच नव्हता मोका
पाउस माझा पाहूणा होता, त्याचे आतिथ्य करायला नको का?

मी पावसाशी खूप बोलले, मी पावसाशी खूप खेळले
भांडले ही त्याच्याशी, पण पुन्हा पाउल त्याच्याकडेच वळले

दिवसभर पावसाशी माझी छान जमली गट्टी
खोटा पैसा दिला तरी सर आली मोठी

रात्री मला झोपवताना अंगाई गाऊन गेला
स्वप्नात येऊन त्याच्या घरचे निमंत्रण देउन गेला

amoul

स्वप्नात येऊन त्याच्या घरचे निमंत्रण देउन गेला

अहाहा किती छान ओळ आहे हि

gojiree

खूप खूप धन्यवाद
मला तुमचे अभिप्राय खूप आवडतात
कारण तुम्ही कुठली विशिष्ठ ओळ छान आहे ते सांगता
पुन्हा एकदा धन्यावद

rudra

far sundar aahe
thanx..................... 8)