आनंदाने जगायचे आहे

Started by sulabhasabnis@gmail.com, February 19, 2011, 12:51:49 PM

Previous topic - Next topic

sulabhasabnis@gmail.com

         आनंदाने जगायचे आहे
फुललेला वसंत कधी सरला कळले नाही
दाहक ग्रिष्माशी सूर माझे  कधी जुळले नाही
प्रभातकालचे सोनकण मनभरून नाही लुटले
संध्यारंगहि कधि डोळेभरून नाहीच न्याहाळले
चांदरातीचे मोहरले क्षण पाहता पाहता विरले
गर्द रातीचे अंधारकण भोवती भरून राहिले
दाट काळोखातली वाट अजून चालायची आहे
चांदण्यांच्या तेज:कणांची साथ शोधायची आहे
आयुष्याची सायंकाळ त्यात उजळायची आहे
शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने जगायचे आहे
               ----------------------         

Kiran Mandake


         आनंदाने जगायचे आहे
फुललेला वसंत कधी सरला कळले नाही
दाहक ग्रिष्माशी सूर माझे  कधी जुळले नाही
प्रभातकालचे सोनकण मनभरून नाही लुटले
संध्यारंगहि कधि डोळेभरून नाहीच न्याहाळले
चांदरातीचे मोहरले क्षण पाहता पाहता विरले
गर्द रातीचे अंधारकण भोवती भरून राहिले
दाट काळोखातली वाट अजून चालायची आहे
चांदण्यांच्या तेज:कणांची साथ शोधायची आहे
आयुष्याची सायंकाळ त्यात उजळायची आहे
शेवटच्या क्षणापर्यंत आनंदाने जगायचे आहे
               ----------------------       

:"Khup kahi sangate tumchi kavita; ani if you write such nice songs, definately you won't need to compromise, every good thing will come to you."

sulabhasabnis@gmail.com

कविता रसिकतेने वाचल्याबद्दल आणि आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद--!!
आपल्या सदिच्छेबद्दल मनापासून धन्यवाद----!!! 
आपल्याला ही जीवनात  सुख समृद्धी लाभो---!!!!