राजा शिवाजी

Started by Shweta261186, February 19, 2011, 05:58:31 PM

Previous topic - Next topic

Shweta261186


नगार्‍यांच्या नादात शिवनेरी आनंदला
आई जिजाऊच्या पोटी वाघ जन्मास आला
पराक्रमाचा बादशाह महाराष्ट्री अवतरला
एकची तो राजा शिवाजी जाहला

हजारो मावळे उभे ठाकले,दिसली नवी आशा
मर्दमराठी पराक्रमाने दुमदुमल्या दाही दिशा
तोफांसमोरी तलवार घेऊनी उभा ठाकला
एकची तो राजा शिवाजी जाहला

उरी बाळगूनी स्वप्न हिंदवी स्वराज्याचे
बांधूनी तोरण हजारो गड-किल्ल्यांचे
घडविले ज्याने नव्या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

राजे असंख्य झाले आजवर या जगती
पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला



                                              --श्वेता देव

amoul

गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला
एकची तो राजा शिवाजी जाहला

कविता खूप छान आहे, अभिमान वाटावा अशी

chetan (टाकाऊ)

"लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही, लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन शांत बसायला मी काही संत नाही



khupach channn ahe
avadali
khup chan

rudra

तुमची  लेखणी अप्रतिम आहे.....मी काहीच बोलू शकत नाही......एवढाच...  जय महाराष्ट्र ! ...................................................... 8)