"मी...."

Started by charudutta_090, February 21, 2011, 04:43:19 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

IIओम साईII
"मी...."

मीच तेज,मीच वायू ,मीच जल,मीच आकाश,
मीच भावना,मीच वैराग्य,मीच आनंद,मीच हताश;
मीच पृथ्वी,मीच अग्नी,मीच शून्य आवकाश,
मीच एक स्वयं तेजीत,ओंकारीत प्रकाश..

गती मी,स्थिर मी,वेग मी,मीच सावकाश,
मीच भक्ती,मीच तृप्ती,मीच,मुक्ती,मीच पाश,
मीच अणू,मीच रेणू,मीच क्रिया,मीच विनाश,
मीच एक स्वयं तेजीत,ओंकारीत प्रकाश.

मीच शुभ्र,मीच नील,मीच स्वयं रंगीत पलाश
वैराग्य मी,भोग मी,मीच तो अविनाश,
मीच कृती,मीच वाणी,मीच तो भाष्य सुभाष,
मीच एक स्वयं तेजीत,ओंकारीत प्रकाश.

मीच ध्यान,मीच धारणा,मीच तो एकांश,
मीच लय,मीच स्तिथी,मीच तो परब्रम्हांश,
मीच व्याख्या,मीच उदाहरण,मीच जिवन सारांश,
मीच एक स्वयं तेजीत,ओंकारीत प्रकाश.

मीच पशु,मीच आसुर,मीच तो दैवांश,
मीच चैतन्य,मीच चलन,मीच एक क्षणनिराश;
मीच मानव,मीच वलय,स्थूल मी,मीच सुप्तांश,
मीच एक स्वयं तेजीत,ओंकारीत प्रकाश.
चारुदत्त अघोर.(दि.९/१०/१०)