जर असं कधी घडलं असतं..

Started by charudutta_090, February 23, 2011, 01:49:19 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई.
जर असं कधी घडलं असतं..

एक पडीत बीज,जर रोवलं असतं,
कोरड्या मातीस जर,ओलावलं असतं;
कदाचित एक रोपटं,उगवलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

बारीक फांदिहून,खोडावलं असतं,
विकसित होऊन,वृक्षावलं असतं;
डाहाळीटोकावर थोडं पालवलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

अंगणास सावलून घेरावलं असतं,
थंड छायेत कोणी टेकावलं असतं;
थकून पाठी रेटलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

तेच कोणी,रेटून उठलं असतं,
उमेदीत आशेने,चाललं असतं;
आपल्या गावी पोहोचलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

असंच कोणी नवं-जोडपं आलं असतं,
शृंगारी क्रीडेत लपलं- छुप्ल असतं,
पाल्यापाचोळ्यात,विसावलं असतं;
जर असं कधी घडलं असतं..

तेच जोडपं,शपतून लग्नावलं असतं,
एकत्रित होऊन संसारलं असतं;
तिघाहून,परत कधी आलं असतं ,
जर असं कधी घडलं असतं..
                                 
कधी वाटसरू खूण म्हणून पडलं असतं,
पायथी दगड शेंदरून,त्यास देवलं असतं;
श्रद्धा भावनेने,कोणी सहज नमलं असतं
जर असं कधी घडलं असतं..

प्रणयी ऋतूत कधी मोहरलं असतं,
टवटवून कधी,फळावलं असतं;
फळावून परत बिजावलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

कधी शहारून,हललं असतं,
वयून कधी थकलं असतं,
थकून फांदीस सुकलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

जोपास्त्या दोन हातास मुकलं असतं,
आतल्या आत खूप दुखलं असतं;
रसरूपी तुटल्यापानी रडलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..

वृक्षित देही शिळकरुपी टोचलं असतं,
जखमी हृदयी शरिरी बोचलं असतं;
तेंव्हाच एक नवं-काव्य रचलं असतं,
जर असं कधी घडलं असतं.. 

रचित काव्य परत रेखाटलं असतं,
संग्रही जमवून समेटलं असतं;
शब्द रुपी काव्यबीज परत पडलं असतं,
जर असं कधी घडलं असतं..!!
चारुदत्त अघोर.(दि.७/२/११)

santoshi.world

chhan ahe ... vachatana maja ali ... dolyansamor ek vadache zad lahanache mothe hotana disu lagale ................. fakt shevatche 3 para samajale nahi kashavar rachale ahet te ....