te divas ata kuthe

Started by yogi10, March 01, 2011, 03:41:56 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

Thanks विजेंद्र ढगे for help provided. :)

:) ... विजेंद्र ढगे ... :)

What THANKS in that.... माझा तर एकच नियम आहे दुसऱ्यांना नेहमी मदत करत राहा...तुमच्या अडचणीच्यावेळी कोणी ना कोणीतरी नक्की मदत करील...


(V)-Versatility is at the best
(I)-Impossible is nothing
(J)-Jealousy never work
(E)-Enjaoy evry Moment
(N)-Never run for Victory
(D)-Dare is in blood
(R)-Run 4 Perfection
(A)-Always ready for Help  ...
:D :D D:

Aditya Washimkar


ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची
दूर ती गेली तरीही सावली भेटायची


त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
पावसाला पेच होता ह्या सरी वळवू कुठे
चिंबताना त्या पुलाखाली ती नदी थांबायची


वर निळी कौले नभाची डोंगराची भिंत ती
ते नदीकाठी भटकणे हीच शाळा व्हायची
जीर्ण ह्या पत्रातुनी मी चाळतो मजला असे
ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची


गवतही भोळे असे की साप खेळू द्यायचे
सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची
फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची


विजेंद्र





अजय जावळे

अतिउत्तम खुपच चांगली
आहे

pooja Kale

Nice ahe... Mi pn khup divs shodhat hote hi kvita... Thank you sir....