"खिडकी "

Started by charudutta_090, March 04, 2011, 01:14:58 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

II ओम साई II
"खिडकी "
कशी विसरू ती  वाट,जरा सरळ,पुढे वळून पूर्ण मोडकी,
एक वयस्क भिंत,त्याच्यातली मला आयुष्य देणारी खिडकी;
वाट चुकवून मी एकदा आलेलो,समोर दुकानात काही घ्यायला,
नकळत मी वर बघणे,आणि तू खिडकीत दिसायला;
जरा गोड रागातच,तुझी पाटी ढकलून,तो पडदा सर्काविणे,
माझे उस्फुर्त पणे स्मित,ज्याला तू हसून,शिष्ठ नजर भिर्काविणे;
त्या एका लकबितच मी घायाळ होऊन तुझ्या मनात पाउलणे,
ती रात्र जागूनच तो क्षण मी लोभावून,सतत चाहूलणे;
हजार रात्रींची ती एक रात्र,जसा महागलेला होणारा एकच प्रहर,
खुळ्या मनाला वश होऊन मी हजर त्या गल्लीत,सोडून माझं शहर;
ओल्या धडधडत्या धड्कीने,मी जीव मुठीत बांधून मी आलेलो,
निरागसपणे खिडकीला पाहत,सारे देह भानच विसरलो;
तुही जशी तारावून  माझ्याशी,पूर्ण रात्र ओझावून काढलेली,
जसा मी येणारच,या खात्रीने खिडकीत पडद्याला अडलेली;
अशी हसलीस,कि मनीचे सर्व धाकच कोसो दूर पळाले,
त्या हास्याने मी तुझाव्लो,या भावनेने एक जीवनच मिळाले;
त्या एका क्षणी जग जिंकून,सर्वात श्रीमंत असल्यागत वाटलं,
कुठलाच विलंब न करता,तुला घेऊन  जीवन थाटलं;
किती नकळत आज त्या खिडकी समोर उभा मी ओलावून ती आठवणींची लाट ,
का उगाच वाटले,कि अझुनही कोणी का बघत असेल तिथं एखाद्याची वाट;
पुन्हा त्या दिवसांच्या  धडधडीने,अनुभवली तीच उरातली धडकी,
जीवापार् आतुरतेने, ओढावलो पाहायला तीच जुनी खिडकी;
होता फक्त अंधार,न तू,न तो पडदा,न ती नजर माझ्यात अटकलेली,
थोड अजून जवळ जाताच, दिसली जीव धरून  खिळ्यांवर लटकलेली....!!!!
चारुदत्त अघोर. (दि.१४/१२/१० )

प्रिया...


Lucky Sir

shevatche yatharth chhan jamlay :) hrudaysparshi

charudutta_090