तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |

Started by :) ... विजेंद्र ढगे ... :), March 07, 2011, 12:59:23 PM

Previous topic - Next topic

:) ... विजेंद्र ढगे ... :)

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
  तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
  तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 
   

तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
  तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
   

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
  माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
  जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
  वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
   

मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
  हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
   

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||

* कविता फारच छान आहे.....पण कोणी लिहिली आहे ते माहित नाही ....*
विजेंद्र

Honey

कवीचं नाव आठवत  नाही  :(  पण नागपूरचे आहेत. आणि आणि हि एक दीर्घ कविता आहे . १०० पानांच्या पुस्तकात 'ती' च वर्णन आहे.एकेका अवयवाच सुंदर वर्णन आहे कुठेही अश्लीलता नाही. कुणालाही आपली 'ती' आठवावी  आणि तमाम मुलींनी आपल्या  सौदर्याचा अजून थोडा गर्व करावा  ;) इतक सुंदर सहज वर्णन आहे.....   गारवा फेम मिलिंद इंगळे यांनी अतिशय मेहनत घेऊन त्याच्यावर  अल्बम (२१ अंतरे असलेल पहिलच मराठी   गाण ) बनवला आहे...जरूर ऐका.. इंटरनेट वर उपलब्ध  आहे..... :)    कवीला कोटी कोटी सलाम  आणि मिलिंद इंगळे न शतशः धन्यवाद.... :)

:) ... विजेंद्र ढगे ... :)


amoul

hya kaviteche kavi aahet ........"Dnyanesh Wakudkar"   http://dwakudkar.blogspot.com.

aani he gane tabbal 35 minitache aahe !! kharach khupach chhan

mahesh matale

Dhyanesh vakudakar sir abhi kuch din pahle s.s.jaiswal collage arjuni/mor. Me aaye the.hmne unki SB poem ko khup enjoy kiya.hajaro me ek hai o.salam unko or unki sakhe saajani ko.

Vinod rodage


Dhanyawad

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
  तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
  तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 
   

तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
  तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
   

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
  माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
  जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
  वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
   

मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
  हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
   

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||

* कविता फारच छान आहे.....पण कोणी लिहिली आहे ते माहित नाही ....*
विजेंद्र


सर या गाण्याचा मी प्रचंड वेडा आहे.मला या गाण्याचे संपूर्ण शब्दरचना मिळतील का?

vishal r pawar

माझा कडे पूर्ण सॉंग आहे हे २३ मि चे खूप छान आहे