वाढदिवस!!

Started by Jai dait, March 10, 2011, 02:04:33 PM

Previous topic - Next topic

Jai dait

आज माझ्या एका खास मैत्रिणीचा वाढदिवस आहे. तिच्यासाठी लिहिलेली ही कविता.. 
--------------------------------------------------------------   
रोजच्या धकाधकीच्या जगण्यात येतो एक आड दिवस 
आला आहे अगदी आज, जसा तुझा वाढदिवस     

तुझ्या आकांक्षापुढे होऊ दे गगन ठेंगणे   
तुझ्या संगतीत शिकतील सारे स्वप्न रंगणे 
जगण्याचा एक दिलासा, तुझ्या हसण्यात 
अन मग झोकुन द्यावे पुन्हा वाटते जगण्यात     

पुरावावेत सारे लाड तुझे, आज तुझा लाड दिवस 
मनमानी करून घेण्यासाठीच असतो ना वाढदिवस!!     

काय भेट द्यावी तुला? प्रश्न असा पडला... 
रम्य एक सायंकाळ, त्यावर चन्द्र जडला..
ता-यानी लगड़लेले डोईवर आकाश खुले 
तुला देण्यासाठी माझ्याकडे हीच शब्द्फुले     

जगण्याचे असू देत सारे, नकोत नुसते 'काढ'दिवस 
माझ्या शुभेच्छा तुझ्यासाठी, सारेच व्हावेत वाढदिवस!!     

-जय

santoshi.world

chhan ahe :) ... kavita upyogi padel kadhitari mala hi ;) ..... pan tuzya navasakat send karin dont worry :)

amoul

Khup chhan aahe tuzi kavita!! sangrahi rahil mazya (of course tuzya nava sakat)

shruti bhosale

very nice poem man. I like it very much. :) ;) :D ;D 8)

prakash savar

santosh patil yanchya navavarun kavita

jeetu

 असे किती प्रश्न?? अशी रात झुरण्यासाठी ...
        तू हवी आहेस आज समोर डोळ्यात भरण्यासाठी ........
  शब्द म्हणून तूच आहेस येथे की, नुसता आभास आहे ....
       रात्र पुरते कुठे तुझ्यासवे फिरण्यासाठी.....
    कालची ती गाणी आठवणीतली नको आहे
         ओठावर गुलाबी रंग ठेव मला पुसण्यासाठी.......
     आड येते अंतर भीती तुला कोणती आहे
          जागा मनात आहे ना मला शिरण्यासाठी .......
    माझ्या हट्टातून सोडवलेस स्वतःला त्या दिवशी तू प्रतीक्षा
           तू घेशील ना हात हातात धरण्यासाठी....तुझा p 9158831192

JEETU