"ती स्त्रीच काय..."

Started by charudutta_090, March 16, 2011, 12:16:57 PM

Previous topic - Next topic

charudutta_090

ओम साई.
"ती स्त्रीच काय..."
ती मांगच काय,जी सिंदुरीत नाही,
डोळेच काय,जे काजळीत नाही,
ती नजरच काय,जी लज्जित नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते ओठच काय,जे लालीत नाही,
ते गालच काय,जे खळीत नाही, 
नक्षी-नाक काय,जे नथनीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ती मानच काय,जी गोंडीत नाही,
ती कंठीच काय,जी साज-सरीत नाही,
गळाच काय,जो सौभाग्य सुत्रीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते केसच काय,जे गजरीत नाही,
जीउणीच काय,जी पान-विडीत नाही,
ते कानच काय,जे कुंडलीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते दंडच काय,जे वाकीत नाही,
ते मनगटच काय,जे चुडीत नाही,
ती बोटंच काय,जी अंगठीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते हाथच काय,जे हिनीत नाही,
तळवेच काय जे,ओल्या मेंदी वासित नाही,
ती नखंच काय,जी रंगीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ती लचकच काय,जी नखरीत नाही,
ती चालच  काय,जी मुरडीत नाही,
ती कंबरच काय,जी खोचल्या पदरी छल्लीत नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते जवळून जाणच,काय जे सुगंधित नाही,
ते दरवळणच काय,जे मंत्र-मुग्धीत नाही,
ते स्त्रीत्वच काय,जे पुरुष बंधित नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही..

ते पाऊलच काय,जे पैन्जणीत  नाही,
बोटच ती काय,जी जोड्वीत नाही,
ती चाहूलच काय,जी रुणुझुणीत नाही
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही.

ते कपाळच काय,जे मळवटीत नाही,
ती हनवटीच काय,जी तीळीत नाही,
तो आवाजच काय,जो स्वरित नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही.

ते जीवनच काय,ज्यात स्त्रीच नाही,
तो त्यागाच काय,जो भोगीतच नाही,
ते शिवत्वच काय,ज्यात शक्तीच नाही,
ती स्त्रीच काय,जी शृंगारीत नाही.
चारुदत्त अघोर.(१५/३/११)