हायवेवरती

Started by phatak.sujit, March 17, 2011, 08:56:27 PM

Previous topic - Next topic

phatak.sujit

हायवेने जाणाऱ्या माणसाला मिळतात डोळे
अनिवार्यपणे
असं नाही
पण मला ते मिळाले हे काही खोटं नाही

हायवेवरती माणसाला भेटतो ईश्वर
हायवेवरती माणसाला भेटतो दैत्य
हायवेवरती गती समजते होऊन सत्य

हायवेने जाणाऱ्या माणसाला मिळतात डोळे
अनिवार्यपणे
असं नाही
पण मला ते मिळाले हे काही खोटं नाही

हायवेवरती चर्चेला येतो दैत्य
वाकडं घे म्हणतो तो मला ईश्वराशी
दैत्य परिचित, ईश्वर स्ट्रेंजर माझ्याशी


हायवेने जाणाऱ्या माणसाला मिळतात डोळे
अनिवार्यपणे
असं नाही
पण मला ते मिळाले हे काही खोटं नाही

हायवेवरती कुत्री चिरडून पडलेली
काही इच्छा सुध्दा जशा वारलेल्या
माझ्या जगण्यामधुनच हायवे गेलेला


सुजीत