Mr. Sujit's suicide

Started by phatak.sujit, March 17, 2011, 09:00:53 PM

Previous topic - Next topic

phatak.sujit

त्वचेच्या आतपर्यंत घुसलेला ऑर्केस्ट्रा
बंद होतो एका बटणात


एक माणूस बघत जातो
एक झोपलेला रस्त्याकडेला
एक जॅकेटधारी
एक उघडा
दहा जण फिरताय्‌त
सत्त्याहत्तर लोक झोपेत
चार गाडीत
एक टॉवरवर
एक आणि तीनशे दोन झोपडीत
पाचशे नऊ आणि दोन हजार नव्वद घरात


माझ्यात आहे एक चार्ल्स बुकोवस्की
एक गुलजार
एक बॉब डिलन
एक मी
एक तू
एक तो
एक ब्रह्म
एक एक करत सगळे


एक डावीकडे बघत गेला
एक समोर बघत गेला
एक उजवीकडे बघत गेला


मी कवी हीच ओळख
माझी पॅन्ट जॅकेट दारूचा ब्रॅन्ड बाईक
आयपॉड सिमकार्ड पीसी ह्या गोष्टी बाद आहेत
माझ्यात अजुनही एक मध्यरात्रीचं जेवण
तेलकट घाणेरडं अन्न
एक तुपाचं गोडाधोडाचं सुग्रास ताट
एक दुधाचा ग्लास
माझ्यात असं बरंच काही.


तुला माहिती नाहीये आत्महत्या.


मी गेलो होतो पुलावर.
बाईक लावून,
चढलोय कठड्यावर,
त्यावेळी सगळं आहे तसंच दिसतं
काही बदलत नाही
तसंच असतं नदीचं पाणी
शहर जग आपण
नातेवाईक प्रेमं एक्सेस.
फक्त एक गोष्ट बदलते-
पक्की होते कवितेवरची निष्ठा
आपल्या कविता खऱ्याच होत्या हे कळतं


मी गेलोय रुळावर
पाहिलिये ट्रेन अंधारातून माझ्याकडे येणारी
पांढऱ्या आखीव कागदावर लिहीत जावं
शब्दापाठोपाठ शब्द
ओळीखाली ओळ
तशी पुढे येत जाते ट्रेन
लाईट सरळ घुसतो तुमच्यावर
नाटकातल्यासारखं
सेंटरस्टेजला असल्यासारखं वाटतं
इथून पुढे कस लागणार असतो
निभावून न्यायचं असतं
तुमच्या मरणावर लोक टाळ्या वाजवणार असतात
रडणार असतात
'शांती मिळो' म्हणणार असतात
कविता लिहिणार असतात


ट्रेन सरकत येते पुढे
तुमचीही तयारी असते मरण्याची
त्वचेखाली पसरलेला ऑर्केस्ट्रा
एका बटणात बंद होणार असतो...


-तू अनुभवलं नाहीयेस अजून हे
बापाचा फोनवरून ऐकू येणारा एक 'हॅलो'
कसे तुमचे सगळे बेत
आत्महत्येचे
हाणून पाडतो
तू अनुभवलं नाहीयेस अजून.


-सुजीत


amoul

mastach aahe re kavita !! ekdum solid !! khup touch zali...

vikramsmita


rupeshmore84


aadwait.kale

no words mr. sujit ,,,,,
best.