पण मी थांबतोय

Started by phatak.sujit, March 17, 2011, 09:02:15 PM

Previous topic - Next topic

phatak.sujit

माझ्या आयुष्याची केवढी वर्षं
झोपण्यात गेली
जागेपणी सैरभैर असण्यात गेली.


तुझ्या रिप्लायची वाट बघत बसलोय
रात्र थंड थंड होत चाल्लिये
'केवढा रिक्तपणा असतो रे आयुष्यात
कशानेच भरून निघत नाही
नोकरी,कविता, पैसा, गाणी, अन्न,
शरीर, पुस्तक
कशानेच नाही'
असा टेक्स्ट पाठवलेलाय मी तुला.


पेटी घेऊन बसलो होतो सकाळी
थोडे सूर काढले,
धुना वाजवल्या,
ठेवून दिली.
अशा वेळी मला प्रकर्षानं वाटतं
'माणसानं सेन्सिटिव्ह असू नये, त्रास होतो.
कवी तर अजिबात असू नये, फार त्रास होतो.'


नेहमीचा सवयीचा प्रश्न विचारला
'वेड लागलंय का मला?'
पण परत म्हटलं रात्रीपुरता प्रॉब्लेमय फक्त.
झोपेआधीची अस्वस्थताय ही.


विचार केला मैत्रिणीला फोन करावा.
परत नको म्हटलं, नाही केला.
तुला नाही कळणार
किती अवघड असतं हे असले
नकार झेलणं स्वत:च स्वत:चेच.
(नाती अशा वळणांवर जाऊन का पोचतात?)


माझ्याबरोबर जाळून टाक
माझ्या कविता.
तेवढाच त्यांचा प्रवास असेल,
मी बजावलंय मलाच.


ही कविता संपली नाहीये
पण मी थांबतोय.


-सुजीत

प्रिया...

Sahi... Heart touching in fact heart breaking :( :( :(

Rahul Kumbhar

Classic....
Nishabdh..  :-X
My standing ovation for this poem..
Keep posting..

amoul


Kiran Mandake


माझ्या आयुष्याची केवढी वर्षं
झोपण्यात गेली
जागेपणी सैरभैर असण्यात गेली.


तुझ्या रिप्लायची वाट बघत बसलोय
रात्र थंड थंड होत चाल्लिये
'केवढा रिक्तपणा असतो रे आयुष्यात
कशानेच भरून निघत नाही
नोकरी,कविता, पैसा, गाणी, अन्न,
शरीर, पुस्तक
कशानेच नाही'
असा टेक्स्ट पाठवलेलाय मी तुला.


पेटी घेऊन बसलो होतो सकाळी
थोडे सूर काढले,
धुना वाजवल्या,
ठेवून दिली.
अशा वेळी मला प्रकर्षानं वाटतं
'माणसानं सेन्सिटिव्ह असू नये, त्रास होतो.
कवी तर अजिबात असू नये, फार त्रास होतो.'


नेहमीचा सवयीचा प्रश्न विचारला
'वेड लागलंय का मला?'
पण परत म्हटलं रात्रीपुरता प्रॉब्लेमय फक्त.
झोपेआधीची अस्वस्थताय ही.


विचार केला मैत्रिणीला फोन करावा.
परत नको म्हटलं, नाही केला.
तुला नाही कळणार
किती अवघड असतं हे असले
नकार झेलणं स्वत:च स्वत:चेच.
(नाती अशा वळणांवर जाऊन का पोचतात?)


माझ्याबरोबर जाळून टाक
माझ्या कविता.
तेवढाच त्यांचा प्रवास असेल,
मी बजावलंय मलाच.


ही कविता संपली नाहीये
पण मी थांबतोय.


-सुजीत

"One Of the best poem I have ever heard."

yogesh13.sh


gaurig