आयुष्यावर बोलायचा माझा एक प्रयत्न.. :)

Started by vijay_dilwale, March 18, 2011, 01:31:18 PM

Previous topic - Next topic

vijay_dilwale

आयुष्य...


आयुष्य म्हणजे झाड...
रंगीबेरंगी पाना-फुलांचं...
काट्यांची बोचरी धार आहे सर्वांनाच..
तरी कोणाचं वाळवंटी निवडुंगाच...तर कोणाचं फुललेल्या गुलाबाचं..


आयुष्य म्हणजे झाड...
बीजातून अंकुर फुटताक्षणी..
फक्त आणि फक्त उंचच उंच व्हायला धडपडणार..

तारुण्याच्या वसंतात...
हिरवीगार पालवी फुटणार...
अन...दुःखाच्या पानगळीत..एक-एक पान ढाळणार...

आयुष्य म्हणजे झाड...
कुणाचं वितभर...तर कुणाचं ढगभर...
पण त्याच्या "केवढं" असण्याला किंमत असते टिचभर...
सदाफुलीवर कायम फुलांचा डोंगर..
पण त्याला नाही रातराणीची सर..


आयुष्य म्हणजे झाड...
उन्हा-पावसात घट्ट पाय रोवून उभं राहणारं...
आपल्या कुशीत अगणित जीवांना आसरा देणारं..
कधी वेल होऊन वादळाच्या दिशेने नमतं घेणार...
अन वेळ आल्यास वडासारखं निधड्या छातीने संकटाला सामोरं जाणार...



आयुष्य म्हणजे झाड...

कुणाचं अशोकासारखा सरळमार्गी वर चढणार...

तर कुणाचं वेड्या बाभळीसारख गुंता करून बसणारं..

कुणी कसं जगावं..हे ज्याचे त्याने ठरवावं..

सांगायचा मुद्दा हाच कि...झटपट फळं देणारं झाड कडू लिम्बाच..

अन उशिरा का होईना...किती का कष्ट घ्यायला लागेना..

शेवटी मधुर फळं धरणार झाड आंब्याच...!
-विजय दिलवाले

santoshi.world