पाळणा

Started by gojiree, March 18, 2011, 02:36:28 PM

Previous topic - Next topic

gojiree

माझिया ग अंगणात
आली इवली पाहुणी
खुदू खुदू हसते ग
छोटे माझे बाळ गुणी

माझिया ग अंगणात
येते एक चिऊताई
बाळाच्या इवल्या ओठांत
घास इवलासा देई

माझिया ग अंगणात
बाळ दुडूदुडू धावे
वाटे तिच्या सोबतीने
गावी स्वप्नांच्या जावे

माझिया ग अंगणात
हळू पाळणा हालतो
नभी ढगांच्या आडून
चंद्र बाळाशी खेळतो

gaurig

माझिया ग अंगणात
आली इवली पाहुणी
खुदू खुदू हसते ग
छोटे माझे बाळ गुणी


shashaank

#3
अतिशय गोड बालगीत - आवडलेच...

माझिया ग अंगणात
येते एक चिऊताई
बाळाच्या इवल्या ओठांत
घास इवलासा देई

इथे -
माझिया ग अंगणात
येते एक चिऊताई
इवल्या बाळओठी
घास इवलासा देई -   हे कसे वाटेल - जरुर सांगणे.
धन्यवाद.